top of page
chat.jpg

गोष्टींतून संस्कार...
संस्कारांतून व्यक्तिमत्त्व !

रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे, हितोपदेश आणि पंचतंत्रातील निवडक कथा —
मुलांसाठी सोप्या, रंजक आणि संस्कारक्षम शैलीत.

भीष्म स्टोरी टेलिंग म्हणजे काय ?

आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांना गोष्टी सांगण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीतील मूल्यांची ओळख करून देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण होत चालले आहे. पूर्वी आजी-आजोबांच्या गोष्टींतून जे संस्कार सहजपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत होते, ती परंपरा आज हळूहळू दूरावत आहे.

 

हीच उणीव भरून काढण्यासाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमने ‘भीष्म स्टोरी टेलिंग’ हा ऑनलाइन उपक्रम सुरू केला आहे. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे, हितोपदेश आणि पंचतंत्रातील निवडक कथा मुलांना अत्यंत सोप्या, रंजक आणि आनंददायी शैलीत सांगितल्या जातील.

श्लोक

मंगलमय सुरुवात

गोष्ट

रंजक आणि संस्कारक्षम कथा

शांति मंत्र

शांत आणि प्रसन्न समारोप

गोष्टींचे संस्कार मुलांसाठी का महत्त्वाचे आहेत ?

कल्पनाशक्ती

विचारशक्ती

स्मरणशक्ती

संस्कार व चारित्र्य

भारतीय ज्ञानपरंपरा

कल्पनाशक्तीला
नवी दिशा

विचार, प्रश्न आणि जिज्ञासेला प्रोत्साहन

कथा आणि प्रसंगांतून सहज स्मरण

मूल्यांची रुजवण आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण

आपल्या कथा, ग्रंथ आणि संस्कृतीशी ओळख

गोष्टी या मुलांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहेत. कथांमधील पात्रे, प्रसंग आणि अनुभव मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात, विचार करण्याची क्षमता वाढवतात आणि त्यांच्या मनात नवे प्रश्न निर्माण करतात. कथा ऐकताना मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि जिज्ञासा सहजपणे विकसित होते. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य यातील फरक त्यांना उपदेशातून नव्हे, तर कथांमधील अनुभवातून समजू लागतो. विविध प्रसंगांतून प्रेम, धैर्य, कर्तव्य, प्रामाणिकपणा, करुणा, मैत्री आणि जबाबदारी यांसारखी मूल्ये त्यांच्या मनावर नकळत रुजतात. भारतीय ज्ञानपरंपरेतील कथा मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात आणि त्यांचे भावविश्व, व्यक्तिमत्त्व व चारित्र्य समृद्ध करण्यास मदत करतात.

दररोज एक नवा अनुभव

आठवड्यातील पाच दिवस, झोपण्यापूर्वी मुलांना भारतीय ज्ञानपरंपरेतील एक सुंदर कथा ऐकण्याची संधी — घरबसल्या, आनंदाने आणि संपूर्ण कुटुंबासोबत.

सोमवार ते शुक्रवार

आठवड्यातील
पाच दिवस

रात्री ९.०० ते ९.४५

दिवसाचा सुंदर समारोप एका गोष्टीने

ऑनलाईन सत्र

घरबसल्या
सहभागी व्हा

३ भाषांमध्ये

मराठी • हिंदी • इंग्रजी
​भाषांमध्ये 

या संस्कारप्रवासात सहभागी व्हा...

आपल्या मुलांसाठी रोज एक अर्थपूर्ण गोष्ट, भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख आणि आनंदातून संस्कार — आजच या संस्कारप्रवासाचा भाग व्हा.

मासिक सदस्यता

₹५००/-

₹२००/-

प्रतिमहिना

किमान ६ महिन्यांसाठी नोंदणी आवश्यक - ₹१,२०० एकरकमी

वार्षिक सदस्यता

₹३,०००/-

₹२,१००/-

प्रतिवर्ष

संपूर्ण वर्षासाठी सदस्यता

गोष्ट मुलांसाठी...
आनंद संपूर्ण कुटुंबासाठी !

या कथा केवळ मुलांसाठीच नाहीत. आई-वडील, आजी-आजोबा आणि घरातील इतर सदस्यही मुलांसोबत कथा ऐकू शकतात. दिवसातील हा छोटासा वेळ संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा, संवाद वाढवणारा आणि भारतीय संस्कृतीशी नाते अधिक दृढ करणारा सुंदर अनुभव ठरू शकतो.

bottom of page